घरमहाराष्ट्रएसटीच्या 'विठाई'साठी २०० नव्या कोऱ्या बस!

एसटीच्या ‘विठाई’साठी २०० नव्या कोऱ्या बस!

Subscribe

आता एकूण ७०० एसटी बसेसची खरेदी होणार आहे. या बसेसच्या खरेदीसाठी सरकारकडून एकूण १२.५ कोटी रुपयांचा निधी येत्या विधिमंडळ अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राज्याच्या अत्यंत दुर्गम भागामध्ये देखील शर्थीच प्रयत्न करून परिवहन सेवा पुरवणाऱ्या एसटीला तोट्यातून सावरण्यासाठी मोठं जीवनदान देणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. येत्या काळामध्ये एसटीसाठी तब्बल ५०० नव्या कोऱ्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तोट्यात चाललेल्या एसटीला मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. आता त्यामध्ये अजून २०० बसेसची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण ७०० एसटी बसेसची खरेदी होणार आहे. या बसेसच्या खरेदीसाठी सरकारकडून एकूण १२.५ कोटी रुपयांचा निधी येत्या विधिमंडळ अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाणार आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – एसटी कर्मचारी आणि महामंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना १० कोटींची मदत

- Advertisement -

एकूण ७०० बसेसची होणार खरेदी

गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी ५०० एसटी बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा दुर्गम भागामध्ये सेवा पुरवण्यासाठी एसटीला उपयोग होईल आणि सेवेचा दर्जा सुधारता येईल असा विचार मांडण्यात आला होता. त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आणखीन २०० बसेस खरेदीचा प्रस्ताव मांडला. खास पंढरपूर यात्रेसाठी या बसेसची खरेदी करण्यात यावी असा प्रस्ताव रावतेंनी मांडला होता. विशेष म्हणजे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही लगेच या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत या अतिरिक्त २०० बसेससाठीही राज्य सरकारकडून निधी देण्याची तयारी दर्शवली.

नव्याने पंढरपूर यात्रेसाठी सुरू करण्यात येणाऱ्या विठाई बससेवेसाठी आणखी दोनशे बस देण्याची आम्ही विनंती केली. अर्थमंत्र्यांनी या खरेदीसाठी देखील तयारी दर्शवली. त्यानुसार सदर मागणीस अर्थमंत्र्यांनी तात्काळ मन्यता दिली असून एकूण ७०० बसेस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य केले जाणार आहे.

दिवाकर रावते, परिवहन मंत्री

पंढरपूर यात्रेसाठी विशेष ‘विठाई’ सेवा

एसटी महामंडळाकडून पंढरपूर यात्रेसाठी ‘विठाई’ बससेवा नव्याने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी एसटीला राज्य सरकारच्या सहकार्याची आवश्यकता होता. त्यानुसार दिवाकर रावतेंनी याबाबत अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर मुनगंटीवार यांनी खरेदीसाठी तात्काळ तयारी दर्शवल्याची माहिती दिवाकर रावतेंनी दिली आहे.

- Advertisement -


तुम्हाला हे माहिती आहे का? – खुशखबर! एसटीच्या ताफ्यात ५०० बसेसचा समावेश होणार


सरकारकडून १२.५ कोटींचा निधी

एसटी खरेदीसाठी येत्या अधिवेशन काळात सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये १२.५ कोटींचा निधी दिला जाणार आहे. दरम्यान, राज्यभरात सुरु असलेल्या बस स्थानकांमधील कामाचा आढावा शासकीय स्तरावर घेतला जात असून रखडलेली कामे जलद गतीन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -