घरमहाराष्ट्रशेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल

शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल

Subscribe

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबादमधील ढोकी पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला असून निंबाळकर यांच्यासह तब्बल ५२ लोकांवर गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी ढवळे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही नाव लिहिले होते.

दिलीप ढवळे यांनी १२ एप्रिल रोजी उस्मानबाद तालुक्याच्या कसबे तडवळे या गावी गळफास घेत आत्महत्या केली होती. निंबाळकर यांच्यामुळे आपली मानहानी झाली, जमिनीवर जप्ती आली या कारणामुळे आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहिली होती. त्यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे देखील नाव लिहिले होते. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

आता पाच महिन्यानंतर पोलिसांनी सर्व तपासाअंती खासदार ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक, तेरणा कारखान्याच्या अध्यक्षा आनंदीदेवी राजे निंबाळकर, तेरणा कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशा एकूण ५२ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -