घरCORONA UPDATELockDown: वाधवान कुटुंबासह २३ जणांवर गुन्हा दाखल; १४ दिवस राहणार क्वारंटाइन

LockDown: वाधवान कुटुंबासह २३ जणांवर गुन्हा दाखल; १४ दिवस राहणार क्वारंटाइन

Subscribe

वाधवान कुटुंबासह २३ जणांना पाचगणीच्या बेल एअर हॉस्पिटलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाइनही करण्यात आले आहे.

देशात संचारबंदी असतानाही वाधवान कुटुंबाने खंडाळा ते महाबळेश्वर गाडीने प्रवास केल्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गृहमंत्रालयाच्या पत्रामुळे वाधवान कुटुंबासह २३ जणांनी ५ गाड्यांमधून हा प्रवास केला असून त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना पाचगणीच्या बेल एअर हॉस्पिटलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाइनही करण्यात आले आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्रकार वाधवान कुटुंबियांना चांगलाच महागात पडला आहे. प्रसिद्ध उद्योगपती कपिल आणि धीरज वाधवान यांच्या कुटुंबासह तब्बल २३ जणांनी संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केले असून आता त्यांच्यावर चौकशी आणि कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

- Advertisement -

हे लावले कलम 

शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांत वाधवान कुटुंबासह त्या २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम ५१/२०२० भादंवि कलम १८८, २६९, २७०, ३४ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१-ब साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ चे कलम २ च्या अनुषंगाने स्थापित केलेल्या कोविड-१९ उपाययोजना २०२० च्या ११ प्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आला आहेत.

- Advertisement -

प्रधान सचिवांवर कारवाई 

डीएचएफएलचे संस्थापक असलेल्या वाधवान कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रधान सचिवांनी मदत केल्याने वाद निर्माण झाला होता. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी रात्री उशिरा अमिताभ गुप्ता यांच्या या प्रकरणी चौकशी संपेपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

हे प्रकरण आता विरोधकांनी चांगलेच लावून धरले आहे. सरकारला विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न विचारून भांडावून सोडले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या यांनी सरकारच्या धोगणांवर संशय व्यक्त केला आहे. तसेच कोण्या बड्या मंत्र्याचा हात असल्याशिवाय अशी गंभीर गोष्ट होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. तसेच भाजप नेत्यांनी या प्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -