घरCORONA UPDATEभाजप आमदार दादाराव केचे यांच्याविरोधात एफआयआर दाखल; वाचा काय आहे कारण

भाजप आमदार दादाराव केचे यांच्याविरोधात एफआयआर दाखल; वाचा काय आहे कारण

Subscribe

लोकांनी आणि प्रामुख्याने महिला वर्गाने मोठ्या संख्येने आमदार दादाराव केचे यांच्या घरासमोर गर्दी केली होती. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी केचे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

वर्धा अरवी मतदारसंघातील भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्या घरासमोर गावकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे चित्र काल, रविवारी पाहायला मिळाले. निमित्तही तसेच होते. आमदार दादाराव केचे यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी नागरिकांना मोफत रेशन वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. याकरताच लोकांनी आणि प्रामुख्याने महिला वर्गाने मोठ्या संख्येने केचे यांच्या घरासमोर गर्दी केली होती. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी आमदार दादाराव केचे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

- Advertisement -

वाढदिवसाला रेशन वाटपाचे आवाहन 

कोरोनाचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. परिणामी देशातही २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांनी एकमेकांपासून अंतर ठेवावे, घरात रहावे, सतत हात धुवावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुठेही गर्दी केली जाऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र अशातच वर्ध्यातील अरवीचे आमदार दादाराव केचे यांनी केलेल्या रेशन वाटप आवाहनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमले. देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल ११३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८ झाली आहे. राज्यात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे.

हेही वाचा –

Coronavirus : कोरोनासाठी कंत्राटदारांकडून महापालिकेला २ कोटींची मदत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -