पुण्यात लक्ष्मीपुजनादरम्यान १६ ठिकाणी आग

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पुण्यात संध्याकाळी ७ ते १० या कालावधीत फटाके फोडण्यात आले. दरम्यान १६ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या.

Pune
Fire at 16 locations in Pune
पुण्यात १६ ठिकाणी आगीच्या घटना

दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतीषबाजी आणि धमाल आलीच. त्यामुळे दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडतात. पुणे शहर परिसरामध्ये लक्ष्मी पुजनाच्या दिवशी आगीच्या १६ घटना घडल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी पुजन असल्याने पुण्यात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. कायद्याचे उल्लंघन करुन फटाक्यांची आतिषबाजी पुण्यात करण्यात आली. त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागात आगीच्या घटना घडल्या.

१६ ठिकाणी लागली आग

आगीच्या घटना घडतात त्यावेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षामध्ये गडबड असतेच. सणासुधीच्या काळात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांच्या सुट्टया ही बंद केल्या जातात. त्यांना विषेश सतर्क राहणाच्या सुचना वरिष्ठांकडून दिल्या जातात. फटाके प्रेमींच्या मोठ्याप्रमाणात फटाके फोडतात आणि आगीच्या घटना घडतात. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी संध्याकाळी ७ ते १० या कालावधीत फटाके फोडण्यात आले. दरम्यान १६ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या.

याठिकाणी घडल्या आगीच्या घटना

पुण्यातल्या गुरवार पेठ, रास्ता पेठ, सदाशिव पेठ, कर्वे पुतळा, बावधन, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, सिंध कॉलनी, वानवडी, उंड्री, विमाननगर, खराडी येथे आग लागल्याच्या घटना घडल्या. याठिकाणी झाडांना, घरांना, गाडीला, गवताला आग लागल्या होत्या. या आगीमधे कोणतिही जिवितहानी झाली नाही. मात्र फटाके वाजवताना स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा घटना घडणार नाहीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here