घरमहाराष्ट्रभिवंडीत कापड गोदामांना भीषण आग; पाच गोदामे जळून लाखोंचे नुकसान

भिवंडीत कापड गोदामांना भीषण आग; पाच गोदामे जळून लाखोंचे नुकसान

Subscribe

चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश

भिवंडी तालुक्यात रविवारी पहाटे साधारण ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग लागून लाखो रुपये किंमतीचे हजारो मीटर कापडाचे गठाण जळून खाक झाले आहे.भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडमधील सुप्रीम सोल्युशन प्रा.लि.कंपनीच्या बिल्डिंग नंबर ए – ६ गाळा नं. १६,१७,१८,१९,२० या कापडाचा साठा असलेल्या गाळ्यांना ही आग लागली आहे.


हेही वाचा- अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या पाकला भारतासोबत युद्धात पराभवाची भिती

सुदैवाने रात्रीच्या वेळी ही आग लागल्याने गोदामांमध्ये कोणीही कामगार नसल्याने होणारी जिवीत हानी टळली आहे. ही आग भाडेकरू विकास मोतीलाल अग्रवाल आणि गाळा मालक मेहुल सुरेश पाटील यांच्या गाळ्यांना लागली आहे.

- Advertisement -

या आगीची माहिती भिवंडी शहर महानगरपालिका अग्निशमन दलास मिळताच धामणकर नाका येथील फायर स्टेशनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक टँकरची मदत घेण्यात आली होती. चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -