घरमहाराष्ट्रराजगुरुनगरच्या मुख्य मार्केटमधील दुकान जळून खाक

राजगुरुनगरच्या मुख्य मार्केटमधील दुकान जळून खाक

Subscribe

सणासुदीचे दिवस तोंडावर असताना आज सकाळी राजगुरुनगर येथील वाडारोड वरील मुख्य बाजार असलेल्या ठिकाणी व्यापारी संकुलातील आदित्य फुटवेअर या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. वाडा रोडवर असणाऱ्या साई आर्केड या व्यापारी संकुल असलेल्या इमारतीला अचानक आग लागली. या इमारतीमध्ये कपड्याच्या दुकानांचे मोठे मार्केट असल्याने शेजारील दुकानांना या आगीपासून धोका निर्माण झाला होता. फुट वेअरच्या दुकानाला आग लागल्याने धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते. त्यामुळे बाजूला असणाऱ्या दुकानांचे आणि मालाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. राजगुरुनगर नगरपरिषद आणि SEZ अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणले. मात्र आगीमुळे संपुर्ण दुकानच जळून खाक झाले. दुकानमालकाने सांगितल्यानुसार यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे वाचा – राजगुरुनगर येथे पोलीस झोपले अन आरोपी पळाले

 

- Advertisement -
fire breaks out in rajguru nagar market
आदित्य फुटवेअर दुकान जळून खाक

भर मार्केटमध्ये आग लागण्याच्या घटना राजगुरुनगर शहरात वारंवार घडत आहेत. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचे निर्दशनास येत आहे, त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र याकडे सर्वजण सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. दरम्यान शहरातील आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -