वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात आग; कंट्रोल रुम जळून खाक

वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये कंट्रोल रुम जळून खाक झाले आहे.

Wardha
wardha police superintendent office
वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय

वर्ध्यामधील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला आग लागल्याची घटना बुधवारी घडली आहे. या आगीमध्ये सीसीटीव्ही कंट्रोल रुम जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले असून पोलिसांच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली आहे.


हेही वाचा – नाशिकमध्ये प्रभागनिहाय भाजीबाजार; कॉलन्यांमध्येही हातगाडीवाल्यांना परवानगी


देशात लॉकडाऊन सुरु असल्याने ठिकठिकाणी पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र, अशी परिस्थिती असतानाच वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाला दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीमध्ये सीसीटीव्ही युनिट जळून खाक झाले आहे. आगीची घटना कळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीमध्ये जीवीतहानी झाली नसली तरी कंट्रोल रुमचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here