बीडमधील LIC ऑफिसला भीषण आग; कागदपत्रं, साहित्य जळून खाक

बीडमधील LIC ऑफिसला भीषण आग; कागदपत्रं, साहित्य जळून खाक

बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या एलआयसी (LIC) ऑफिसला आज (सोमवारी) पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये कागदपत्रं आणि साहित्य जळून खाक झाले आहेत. सध्या आग आटोक्यात आली असली तरी संपूर्ण परिसरात धुरा लोट पसरले आहेत. या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही आहे. पण ही आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे.

पहाटे वेळ असल्यामुळे एलआयसी ऑफिस आग सर्वत्र लवकर पसरली. त्यामुळे ऑफिसचं मोठ्या प्रमाणात आर्थिक  नुकसान झाल्याचं समोर येत आहे. ऑफिसमधील जुने दस्तावेज, कॉम्प्युटर आणि महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहेत. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलं नाही आहे. ही भीषण आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल्या झाल्या होत्या. अग्निशमन दलातील जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. ही भीषण आग अग्निशमन दलाने पूर्णपणे आग आटोक्यात आणली आहे. त्यामुळे सध्या ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. पहाटेच्या सुमारास भीषण अग्नितांडव एलआयसी ऑफिसमध्ये झाला असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती.


हेही वाचा – ऐन सणासुदीत ६६ लाखांवर किंमतीचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त