पुण्यातील प्लॅस्टिक गोदामाला आग

पुण्यातील प्लॅस्टिक गोदामाला आज पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मालाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

Pune
fire plastic godown in hadapsar pune
पुण्यातील प्लॅस्टिक गोदामाला आग

पुण्यातील वाघोली येथील मारुती सुझुकीचे साई सर्व्हिस स्टेशनला आग लागल्याची घटना ताजी असताना आज पहाटे पुन्हा एकदा पुण्यातील प्लॅस्टिक गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र, मालाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील हंडेवाडी परिसरात प्लॅस्टिकच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर मात्र, मालाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – पुण्यातील कार शोरुमला भीषण आग


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here