औरंगाबादमधील दुकानांना भीषण आग, अग्निशमनच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल

औरंगाबादमधील दुकानांना भीषण आग, अग्निशमनच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल

औरंगाबादमधील दुकानांना भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. या भीषण आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २ गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

औरंगाबादमधील हर्सूल तलावाच्या गेटसमोरील दुकांनाना भीषण आग लागली आहे. यामध्ये गादी, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानासह अन्य २ दुकाने आगीत खाक झाली आहेत. यामुळे दुकानदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागणार आहे. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.


हेही वाचा – फटाके बंदीच्या निर्णयाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली