घरमहाराष्ट्रभिवंडीत शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबार

भिवंडीत शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबार

Subscribe

सर्व प्रकार घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद, मध्यरात्री दुचाकीवरुन आले होते हल्लेखोर

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले काल्हेरचे शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. गोळीबाराच्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. हा प्रकार त्याच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. ते गोळीबाराच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हा प्रकार त्याच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीत काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख दिपक म्हात्रे हे उमेदवार असून मध्यरात्रीच्या सुमारास ते ठाणे येथून आपल्या पत्नीसमवेत घरी आल्यावर घराच्या बाहेर अचानक त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिव्हॉल्व्हरने तीन वेळा गोळीबार केला. मात्र, सुदैवाने या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत दोघा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू केला. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या वादातून गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर सर्व प्रकार समोर येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -