घरमहाराष्ट्रबीडमध्ये रंगले पहिले बालसाहित्य संमेलन

बीडमध्ये रंगले पहिले बालसाहित्य संमेलन

Subscribe

मुंबईच्या शब्दांगण टीमला बीडमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. बीडच्या जिल्हा परिषद शाळेत पहिले बालसाहित्य संमेलन भरवण्यात आले होते.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता १ली ते ८वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि ‘बालग्राम’ या सहारा अनाथालयामध्ये असलेल्या लेकरांच्या जीवनात दबलेल्या भावनांचा हूंकार व्यक्त करण्यासाठी ‘आधार परिवार’ आणि ‘शिक्षण विभाग गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले बाल साहित्य संमेलन ‘शब्द स्पंदन’  आयोजित करण्यात आले होते. या बालसाहित्य संमेलनाच्या दुसर्‍या सञात पाठ्यपुस्तकातील आणि सुप्रसिद्ध कवींशी संवाद साधला गेला. या कार्यक्रात पाठ्यपुस्तकातील कवी शंकर अभिमान कसबे, सुरेखा गावंडे तसेच  कवी संदिप कांबळे, संजय पाटील, कवयित्री शिल्पा परूळेकर पै, अपर्णा बन्नगरे यांच्या मुलाखती विघ्यार्थांनी घेतल्या. या बालसाहित्य संमेलनाची विशेष बाब म्हणजे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण व्यासपीठ विघ्यार्थांनी सांभाळले.

सर्वच सत्र सांभाळले विद्यार्थ्यांनी

या बालसाहित्य संमेलनात सुञसंचालन, मुलाखत, कविसंमेलन कथाकथन यांसारखे सर्वच सञ विघ्यार्थांनी संभाळले. या बालसाहित्य संमेलनात गेल्या दोन वर्षांपासून ‘संवाद शब्दांचा शब्दाशी’ हा साहित्याची आवड निर्माण करणारा कार्यक्रम महाराष्ट्र भर राबवणारी शब्दांगण कला साहित्य सांस्कृतिक परिषदची टिम निमंत्रित करण्यात आली होती. यात शब्दांगणच्या अध्यक्षा शिल्पा परूळेकर (वसई), उपाध्यक्ष संदिप कांबळे, (भिवंडी), कार्याध्यक्ष संदिप पाटील (वसई), सचिव अपर्णा बन्नगरे (कल्याण) यांसोबत पाठ्यपुस्तकातील कवी शंकर अभिमान कसबे  (बार्शी) आणि सुरेखा गावंडे (कल्याण) या सर्व कवीच्या विघ्यार्थांनी मुलाखती घेतल्या. हे आगळे वेगळे बालसाहित्य संमेलनात विस्तार अधिकारी  काळम पाटील  यांच्या संकल्पनेतून साकार झाले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -