घरCORONA UPDATECoronaVirus - खानदेशात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण!

CoronaVirus – खानदेशात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण!

Subscribe

त्या रुग्णास जिल्हा रुग्णालयातील आयसोलेट कक्षात दाखल करण्यात आले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांची तपासणी करून त्यांना आयसोलेट करण्यात येणार आहे

उत्तर महाराष्ट्र नगर वगळता करोना पासून अलिप्त असताना जळगावात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ४५ वर्षीय हा रुग्ण खान्देशातील पहिला करोना बाधित ठरला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णतः हादरून गेली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला रुग्ण जळगाव शहरातील रहिवासी असून, तो एका ट्रॅव्हल्स एजन्सीत चालक म्हणून कामाला आहे. जळगाव मुंबई अशी सेवा करत आहे. दरम्यान मुंबई येथे राहिल्यानंतर सदरचा रुग्ण जळगावात आल्यानंतर २७ मार्चला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तीन जणांचे अहवाल शनिवारी (दि२८) सायंकाळी प्राप्त झाले. त्यातील ४५ वर्षे इसमाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या रुग्णास जिल्हा रुग्णालयातील आयसोलेट कक्षात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांची तपासणी करून त्यांना आयसोलेट करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा आणखी किती जणांची संपर्क झाला, याचा शोध घेणे सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


हे ही वाचा – राज्यात आज कोरोनाबाधीत २८ नवीन रुग्णांची नोंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -