घरमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या 'लाव रे तो..' नंतर हरिसाल गाव उपसरपंचाचा व्हिडिओ!

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो..’ नंतर हरिसाल गाव उपसरपंचाचा व्हिडिओ!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या सभांची आणि त्यात ते दाखवत असलेल्या व्हिडिओंची! भाजपच्या अनेक योजना कशा फोल आहेत, याचा दावा करणारे हे व्हिडिओ राज ठाकरे त्यांच्या सभांमधून दाखवत आहेत. त्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्याविरोधात विरोधक रान पेटवत असतानाच राज ठाकरेंनी दाखवलेल्या पहिलं डिजिटल व्हिलेज हरिसालमधल्या व्हिडिओला याच गावच्या उपसरपंचानं उत्तर दिलं आहे. तेही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून! या लाइव्हमध्ये हरिसाल गावात कशा पद्धतीने इंटरनेट आणि ऑनलाईन कनेक्टिव्हिटी आहे याचे दावे करतानाच राज ठाकरेंचे दावे खोडून टाकण्यात आले आहेत.

Harisal : Digital Village ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 22, 2019

- Advertisement -

काय आहे या व्हिडिओमध्ये?

हरिसाल गावाचे उपसरपंच गणेश येवले यांनी गावातल्या वेगवेगळ्या इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी सेंटरवर जाऊन फेसबुक लाइव्ह केले आहेत. विशेष म्हणजे, यात सर्व ठिकाणची चालू असलेली इंटरनेट सेवा, इंटरनेटमुळे लोकांना लाभ घेता येत असलेल्या इतर सेवा, कम्प्युटरचे विविध प्रकारचे कोर्स हरिसालमध्ये सुरू असल्याचं दिसत आहे. शिवाय, या केंद्रांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं देखील दिसत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ काढणारे उपसरपंच गणेश येवले, यांनी हरिसालमधलं वास्तव राज ठाकरेंना येऊन बघण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा हरिसालमध्ये व्हिडिओ शूट केला, तेव्हा बाहेरून आणलेल्या माणसाला उभं करून शूटिंग केल्याचा आरोपदेखील येवले यांनी केला आहे.

Harisal : Digital Village ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 22, 2019

- Advertisement -

पहिल्या डिजिटल व्हिलेजच्या पेजवर फक्त १४ पोस्ट!

दरम्यान, येवले यांच्या या व्हिडिओवरून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१६पासून हे व्हिडिओ टाकण्याच्या आधीपर्यंत या हरिसाल डिजिटल व्हिलेजच्या पेजवर फक्त एकच पोस्ट आहे. आणि ती देखील फेब्रुवारी २०१७मधली! मधल्या काळात पूर्णपणे बंद असलेलं हे पेज राज ठाकरेंच्या सभांमुळे अचानक पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झालं आहे. हरिसाल गावाचं वास्तव दाखवण्यासाठी एकूण ४ फेसबुक लाइव्ह येवलेंनी केले आहेत. ही तीन फेसबुक लाइव्ह करेपर्यंत अशा प्रकारचं देशातल्या पहिल्या डिजिटल गावाचं कोणतं फेसबुक पेज आहे, हे देखील कुणाच्या गावी नव्हतं. त्यातही २८ नोव्हेंबर २०१५पासून सुरू झालेल्या या पेजवर फक्त १४ पोस्ट आहेत. त्यामुळे हे पेज किती अॅक्टिव्ह होतं, की आत्ता फक्त अॅक्टिव्ह केलं गेलं आहे? असा प्रश्न देखील इथे उपस्थित केला जाऊ लागला आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – राज ठाकरेंनी केली भाजपच्या डिजिटल इंडियाची पोलखोल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -