घरमहाराष्ट्रठाकरे सरकारची वचनपूर्ती: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर!

ठाकरे सरकारची वचनपूर्ती: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर!

Subscribe

आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारे असल्याचे सांगत, ‘ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी आज, सोमवारी जाहीर होईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. आणि अखेर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर झाली आहे. कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत ६८ गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. एप्रिल अखेरपर्यंत या योजनांची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची नाव पहिल्या यादीत आहेत. लवकरच कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असून, उद्या लाभार्थी शेतकर्‍यांची यादी जाहीर करणार आहे. तसेच गिरणी कामगारांच्या घरासाठी 1 मार्च रोजी लॉटरी निघणार आहे. 35 लाख शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांची यादी तयार केली असून, टप्प्याटप्प्याने कर्ज-माफीची अंमलब-जावणी करणार आहे.ही यादी जाहीर करताना सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -