घरमहाराष्ट्रदेशात पहिली यशस्वी कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

देशात पहिली यशस्वी कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Subscribe

चिमुकलीच्या मेंदुतून जास्त रक्तस्राव झाला होता.त्यामुळे तिच्या मेंदूला धक्का पोहोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. काही न्युरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची हाडं अलगदपणे काढून टाकली.

भारतात पहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. अपघातात जखमी झालेल्या चिमुकलीवर ही शस्त्रक्रिया करुन तिला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. अपघातात जखमी झालेल्या चार वर्षांच्या चिमुकलीच्या मेंदूची निकामी झालेली कवटी डॉक्टरांनी बदलून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. या सर्व प्रक्रियेला दीड वर्षांचा काळ गेला. सुदैवाने आता त्या चिमुकलीचं आयुष्य पूर्ववत झाले आहे.

अपघातात डोक्याला दुखापत

अपघातात डोक्याला दुखापतण्यात राहणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीला कारची धडक दिली होती. या अपघातात चिमुकल्या मुलीच्या डोक्याला जबर मार लागला. तिला रुग्णालयात नेईपर्यंत डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. चिमुकलीच्या कवटीतील हाडांना अनेक जखमा झाल्या होती. त्यामुळे ती वाचेल की नाही,अशी शंका डॉक्टरांना होती. पण डॉक्टरांनी शेवटपर्यंत हार मानली नाही.

- Advertisement -

अशी झाली शस्त्रक्रिया

चिमुकलीच्या मेंदुतून जास्त रक्तस्राव झाला होता.त्यामुळे तिच्या मेंदूला धक्का पोहोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. काही न्युरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची हाडं अलगदपणे काढून टाकली. ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होणार नाही याची काळजी घेतली गेली या मुळे मेंदूला इजा होण्याचा धोका टळला. पण डोक्यासाठी नवीन कवटी बसवणे गरजेचे होते. त्यामुळे अमेरिकेतून खास कृत्रिम कवटी मागवण्यात आली. २ ते ३ किचकट शस्त्रक्रिया करुन कवटी तिच्या डोक्यात बसवण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -