घरमहाराष्ट्रVideo: सावधान! पाचशेच्या नवीन नोटांचे होत आहेत तुकडे

Video: सावधान! पाचशेच्या नवीन नोटांचे होत आहेत तुकडे

Subscribe

पाचशेच्या नवीन नोटांचे तुकडे पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील जर पाचशेच्या नोटा कपाटीत किंवा सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

पाचशेच्या नवीन आणि कोऱ्या करकरीत नोटा हातात पडताच त्याचे तुकडे पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही जर पाचशेच्या नव्या नोटा साठवून कपाटात किंवा कुठल्याही सुरक्षित ठिकाणी ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सांगलीच्या विटा येथील एका वृद्ध महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर विटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय पाचशेच्या नोटांवर नागरिकांकडून प्रश्न विचारले जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सांगलीच्या विटा येथील एका वृद्ध महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही महिला मोलमजुरी करते. दीड महिन्यांपूर्वी तिला ७ हजार रुपये पगार मिळाला होता. हे पैसे तिने आपल्या कपाटात ठेवले. त्यानंतर सोमवारी तिने बाजारात जाण्यासाठी या ६ हजारांपैकी साडे तीन हजार रुपये काढले. साडे तिने हजार रुपये तिने आपल्या रुमालात बांधले आणि ती महिला बाजारात गेली. बाजारात तिने मिरची विकत घेतली आणि पैसे देण्यासाठी रुमालातून पाचशेची नोट काढली. मात्र या नोटांचे आपोआप तुकडे पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिने तिच्या जवळील सर्व नोटांची तपासणी केली. यामध्ये तिच्या जवळ असलेल्या सर्व नोटांचे तुकडे पडल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

नोटाचे तुकडे का पडले?

आपल्या जवळ असलेल्या सर्व नोटांचे तुकडे पडल्याची माहिती या महिलेने सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांना सांगितली. अनिल राठोड यांनी त्या महिलेच्या कपाटातील इतर नोटाही पाहिल्या. त्या नोटांचेही तुकडे पडल्याची माहिती उघडकीस आली. त्यानंतर राठोड सर्व नोटांचे तुकडे घेऊन एसबीआय बॅंकेत गेले. तिथे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटा तपासल्या असता नोटा खऱ्या असल्याची बाब उघडकीस आली. नोटांची अवस्था पाहून बॅंकेचे अधिकारी देखील संभ्रमात पडले. मात्र, एखाद्या केमिकल किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे नोटांचे तुकडे पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी राठोड यांनी ही बाब रिझर्व्ह बॅंकेच्या निदर्शनात आणून देण्याची विनंती केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -