घरमहाराष्ट्रGoodNews! ९ ऑक्टोबरपासून धावणार 'या' पाच स्पेशल एक्स्प्रेस ट्रेन

GoodNews! ९ ऑक्टोबरपासून धावणार ‘या’ पाच स्पेशल एक्स्प्रेस ट्रेन

Subscribe

मिशिन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात राज्यातंर्गत रेल्वे सेवा सुरु करण्याची परवागी

मिशिन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात राज्यातंर्गत रेल्वे सेवा सुरु करण्याची परवागी देण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने पाच जिल्यादरम्यान 5 विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्हांच्या दरम्यान या गाड्या 9 ऑक्टोबरपासून धावणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना महामारीमुळे 21 मार्चपासून राज्यातील रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे गेले सहा महिने केवळ कोविड-19 चे नियम पाळून अत्यावश्यक सेवेत मोडणारी मालवाहतूक तसेच अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या मुळ राज्यात पोहोचवण्यासाठी श्रमिक स्पेशल गाड्या सुरु होत्या. मात्र आता अनलॉक 4 तसेच त्या पाठोपाठ अनलॉक 5 नियम जारी करण्यात आल्याने ठप्प असलेले व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत.

- Advertisement -

तसेच राज्यातील रेल्वे सेवा सुरु करण्यास परवानगी सुद्धा दिली आहे. त्यामुळे अखेर मुंबई, नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 ऑक्टोबरपासून 02189 मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, 02123 मुंबई-पुणे डेक्कन क्कीन सुपरफास्ट एक्स्प्रेस, 02105 मुंबई- गोंदिया विर्दभ एक्स्प्रेस, 02115 मुंबई-सोलापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि 02015 मुंबई-पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार आहे. दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. त्यामुळे या जिल्हांचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


खुशखबर! १७ ऑक्टोबरपासून धावणार तेजस एक्स्प्रेस; आजपासून बुकिंग सुरु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -