घरमहाराष्ट्रमोफत प्रवासापासून ५ हजार विद्यार्थी वंचित!

मोफत प्रवासापासून ५ हजार विद्यार्थी वंचित!

Subscribe

राज्यातल्या १८० दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थांसाठी ‘मोफत प्रवास’ योजना आजपासून सुरू केला आहे. मात्र अजूनही काही विभागातील विद्यार्थ्यांना अजूनही सेवा मिळाली नाही.

दुष्काळामुळे होरपळलेल्या जनतेला दिलासा मिळावा यासाठी शासनाने राज्यातल्या १८० दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थांसाठी ‘मोफत प्रवास’ योजना आजपासून सुरू केला आहे. मात्र अजूनही ही सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. अजूनही अनेक ठिकाणी विद्यार्थी या सेवे पासून वंचित आहे. या सेवेत सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश असला तरी बार्शी तालुक्यातील नऊ मंडलांचा समावेश नाही. त्यामुळे सुमारे पाच हजार विद्यार्थी यापासून वंचित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना सुविधा काही ठळाविक काळा पुरताच मिळणार आहे.

९ तालूके दुष्काळग्रस्त

हिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. बार्शी आणि उत्तर सोलापूर असे दोन तालूके वगळण्यात आले होते. त्यानंतर ७५ मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा समावेश दुष्काळामध्ये करण्यात आला. यामध्ये बार्शी वगळता तालुक्यातील नऊ मंडळांचा समावेश करण्यात आला. दुष्काळाचा पहिला फायदा म्हणून विद्यार्थ्यांना प्रवासी सवलत पास मोफत मिळणार आहेत. खेड्यापाड्यातून शहराकडे शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के सवलत देण्यात येते. शासनाच्या निर्णयामुळे ती पूर्णतः मोफत करण्यात आली असून १५ नोव्हेंबर ते १५ एप्रिल २०१९ पर्यंत ही योजना चालू राहणार आहे. मात्र बार्शी तालुक्यातील मंडलांबाबत अधिसूचना जारी न झाल्याने विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -