घरताज्या घडामोडीयंदाच्या वर्षात अफवांना आला ऊत

यंदाच्या वर्षात अफवांना आला ऊत

Subscribe

यंदाच्या वर्षात अनेक अफवा पसरलेल्या पाहायला मिळाल्यात. त्यातील काही बातम्या चांगल्याच गाजल्या.

२०१९ हे वर्ष विविध घटनांसाठी चांगलेच गाजले. मनोरंजन क्षेत्र असो किंवा राजकारण क्षेत्र सर्वच क्षेत्रात अनेक अफवांचे पिक आले होते. विशेष म्हणजे यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गाजले होते. यावर्षी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. तर अनेक मान्यवरांचे निधन देखील यावर्षी झाले. विविध अंगानी हे वर्ष गाजत असतानाच अफवांनाही चांगलाच उत आला होता. मग राजकारणातील सूत्रांची अफवा असो किंवा प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या घटस्फोटाची अफवा असो. अशा एक नव्हे तर अनेक अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या. अशाच काही महत्त्वाच्या अफवांचा आढावा घेणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसमध्ये विलीन होणार? – सूत्र

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक शपथविधीच्या बातम्या सुरु असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याशी ५० मिनिटे चर्चा केली होती. दरम्यान, पवार – राहुल भेट सुरु असताना विविध बातम्या माध्यमात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या अफवा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आले. तसेच ष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना या वृत्ताचे खंडन केले आहे.

अजित पवार भाजपात?

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी राजीनामा देऊन पक्षात परतले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या शपथविधीपूर्वी नॉट रिचेबल झाल्याने अजित पवार नाराज असल्याची पुन्हा एकदा अफवा पसरली. पण, वेळीच खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आम्ही एकत्र असून रेंज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ते नाराज नसल्याचीही माहिती त्यावेळी देण्यात आली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या अफवा

भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचेही निधन झाले असल्याच्या अनेक अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. तसेच ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्याही निधनाचे वावडे उठले होते.

प्रियांका आणि निकचा घटस्फोट?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत असल्याचे समोर आले होते. प्रियांका आणि निक यांच्यात खटके उडत असल्याचे ते घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण प्रियांकाच्या टीमने दिले.

मुंबईत दहशतवादी हल्ल्याचे सावट?

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानचे आयएसआय भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे. भारतातील १९ शहरे हे लक्ष्य असून मुंबईकरांनी अर्लट राहावे, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र, ही अफवा असून त्यात काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच ही व्यक्ती स्वत:ला मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे असे सांगत होती. पण ते खरे नाही. कारण त्या व्हिडिओतील व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे नाही.

उदगीर शहर स्फोटांने हादरले?

उदगीर शहर गूढ आवाजाने हादरुन गेले आणि त्यानंतर काही क्षणातच स्फोट झाल्याची जोरदार अफवा सर्वत्र पसरली होती. या स्फोटाच्या अफवेसोबतच भूकंपही झाल्याची अफवा पसरली. मात्र वेधशाळेत भूकंपाची कसलीही नोंद झाली नव्हती. जमिनीत निर्माण झालेल्या पोकळीमुळे आवाज झाल्याचे समोर आले होते.

खडकवासला धरण फुटल?

पुणे शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यातच पुण्याच्या खडकवासला धरणाला तडा गेला असून ते फुटल्याची अफवा पसरली होती. मात्र, यात तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पुणे – सातारा महामार्ग बंद?

नीरा नदीवरील सारोळ येथील पुणे – सातारा महामार्गावरील पुलावर पाणी आल्याने महामार्गावरील पुलावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक बंद केल्याची अफवा पसरली होती.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -