घरमहाराष्ट्रपुरामुळे औद्योगिक क्षेत्रातील ४० कारखान्यांचे नुकसान

पुरामुळे औद्योगिक क्षेत्रातील ४० कारखान्यांचे नुकसान

Subscribe

शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे औद्योगिक क्षेत्रातील ४० कारखान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. किल्ले रायगड परिसरातून पाण्याचा मोठा प्रवाह बिरवाडीजवळ सावित्री नदीला येऊन मिळाला. त्यामुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्रात पाणी शिरले. असा प्रकार गेल्या २० वर्षांत झाला नव्हता. पाण्याचा फटका बसलेल्या अनेक कारखान्यांतून उद्याप उत्पादन पूर्णपणे सुरू झालेले नाही.

महाड औद्योगिक क्षेत्र हे पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठिकाण मानले जाते. या ठिकाणी २००५ ला आलेल्या महापुराची पातळी मोठी होती. यावेळी तब्बल सहा ते आठ फुटांपर्यंत अनेक कारखान्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. यामुळे या क्षेत्रातील सी झोनमधील लक्ष्मी ऑग्रॅनिक, लासा, महाड फ्लोरिंग, शाल्को, प्रीव्ही, मल्लक, डुफ्लोन, टायटन, मार्क्स केमिकल, बायो इंडिया, एजीज ग्लोबल, टाइम टेक्नोप्लास्ट आदी कारखान्यांचे नुकसान झाले. एमआयडीसीमधील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातदेखील हीच अवस्था झाली. तेथील स्टोअरमध्ये पाणी गेल्याने नुकसान झाले आहे. कंपन्यांतून पाणी शिरल्याने पंप, ब्लोअर, आदी यंत्रणा पुराच्या पाण्यात बंद पडली, तर कच्चा मालदेखील भिजला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने ठप्प झाली. या पाण्याचा फटका मोठ्या प्रमाणात लहान उद्योजकांना बसला आहे.

- Advertisement -

औद्योगिक क्षेत्रात तब्बल 40 कारखान्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. आवार व प्लांटमध्ये पाणी शिरल्याने कंपन्यांची यंत्रसामुग्री नादुरुस्त झाली आहे. मार्क्स केमिकलचे मालक व महाड उत्पादक संघाचे पदाधिकारी अशोक तलाठी यांनी कारखान्यात पाणी शिरले. त्यामध्ये उत्पादन व मशिन, तसेच संगणकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महाड उत्पादक संघ व सीईटीपीचे व्यवस्थापक जयदीप काळे यांनी सीईटीपीमध्ये तब्बल सहा फूट पाणी असल्यामुळे स्टोअर रूम व प्रयोगशाळेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. अनेक कारखाने लघु क्षेत्रात असल्याने या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -