राज्यात पुन्हा पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील २४ तासांत मुंबईत दमदरा पाऊस झाला. त्याचप्रमाणे उद्या (मंगळवारी) पावसाचा जोर अधिक असेल सांगण्यात आले आहे.
Mumbai received isolated heavy rains in the last 24 hours. Clouding over South Konkan. Forecast for the next 2 days is heavy rainfall in Konkan & Mumbai with increased intensity tomorrow: Deputy Director General (DDG), IMD, Mumbai. #Maharashtra pic.twitter.com/czmt1chFbZ
— ANI (@ANI) July 13, 2020
मुंबई, ठाण्यासह कोकणात चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उपमहासंचालक के. एस. होसळीकर (डीडीजी), आयएमडी, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जुलैपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
आज मुबंईपासून राज्यात चांगला पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले.
हे ही वाचा – काँग्रेसला १०९ आमदारांचा पाठिंबा, राजस्थानमध्ये मध्यरात्री २.३० ला पार पडली पत्रकारपरिषद!