घरमहाराष्ट्रताडोबामध्ये मोबाईल घेऊन गेलात तर सावधान!

ताडोबामध्ये मोबाईल घेऊन गेलात तर सावधान!

Subscribe

१ डिसेंबर २०१८ पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वनविभागाकडून मोबाईल बंदी घालण्यात आली आहे.

चंद्रपुरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाईल बंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून होणार आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात पर्यटक मोबाईल घेऊन गेले तर त्यांच्यावर वनविभागाकडून कारवाई होऊ शकते. वनविभागाच्या या निर्णयामुळे पर्यटकांना वन्य प्राणी, झाडे-झुडपे, पशू-पक्षी यांचे छायाचित्र काढता येणार नाही. परंतु, वनविभागाच्या या निर्णयाला पर्यटकच जबाबदार आहेत.  पर्यटक, गाईड आणि जिप्सी यांच्याकडून वारंवार नियमांचे उल्लंघण होत असल्याने वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार १ डिसेंबर २०१८ पासून सर्व पर्यटक, जिप्सी वाहनचालक आणि मार्गदर्शक यांना व्याघ्रप्रकल्पात जाताना मोबाईल नेण्यास बंदी असेल. शिवाय या नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकाला व्याघ्र प्रकल्पातून बाहेर काढण्यात येईल, त्याचबरोबर मार्गदर्शक आणि जिप्सी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा – पर्यटकांच्या जिप्सीचा वाघीणीने केला पाठलाग

- Advertisement -

प्राण्यांना ‘असा’ होतोय मोबाईलचा त्रास

ताडोबाच्या जंगलात फिरायला जाणारे काही उत्साही पर्यटक कुठलाही प्राणी दिसला की, लगेच जोरजोरात गवगवा करायला सुरुवात करतात. त्या प्राण्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. फोटो काढताना आजूबाजूच्याही पर्यटकांना तो प्राणी पाहण्यासाठी बोलावतात. त्यामुळे एकाच प्राण्याजवळ मोठी गर्दी जमा होते. यामुळे तो प्राणी बिथरतो. शिवाय, काही पर्यटक वाघासोबत सेल्फी किंवा फोटो काढत असतात. अशावेळी वाघ पर्यटकाच्या अंगावर धावून जाऊ शकतो. त्यामुळे गैरप्रकार घडू शकतो. काही पर्यटक प्राण्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. सोबत फोटो कुठून काढला त्या जागेविषयी माहिती टाकतात. या साऱ्या गोष्टींना सराकारने आधीच बंदी घातली आहे. परंतु, या नियमांना धाब्यावर बसून पर्यटक फोटो काढतात. सोशल मीडियामध्ये व्हायरल करतात. त्यामुळे वनविभागाकडून मोबाईल बंदी करण्यात आली आहे.


हेही वाचा – ताडोबा जंगल सफारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -