घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

Subscribe

विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्यामुळे नागपूर कनिष्ठ न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले होते. त्यानुसार आज सुनावणी झाल्यानतंर १५ हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे.

- Advertisement -

जामिन मिळाल्यानतंर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, १९९५ ते १९९८ च्या दरम्यान झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई सुरु असताना आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी माझ्यावर दोन खासगी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर त्या तक्रारी मागे घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख मी केला नव्हता. या प्रकरणी आज कनिष्ठ न्यायालयाने मला समन्स बजावले होते. मी हजर राहिलो. मला पीआर बाँड देऊन पुढची तारिख दिली आहे. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. सर्वच्या सर्व आंदोलनातील केस आहेत. या दोन केसचा उल्लेख करण्याचे कोणतेही कारण नव्हते.”

हे वाचा – अखेर जलयुक्त शिवार योजनेलाही ब्रेक

फडणवीस पुढे म्हणाले की, “निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने मी या केस लपविल्या असे कोणतेही कारण नाही. मी २०१४ आणि २०१९ साली अर्ध्याहून अधिक मते घेऊन जिंकलो आहे. मला अडचणीत आणण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे? ते मला माहीत आहे. योग्य वेळी त्यांच्यावर बोलेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -