घरमहाराष्ट्रभाजपच्या मेळाव्यात फ्रीस्टाईल

भाजपच्या मेळाव्यात फ्रीस्टाईल

Subscribe

पार्टी वीथ डिफरन्स म्हणून स्वत:ची पाठ स्वत:च थोपटणार्‍या भाजपला काल अंमळनेरच्या मेळ्यात चांगलाच झटका बसला. राज्याच्या राजकारणात तडजोडीचे राजकारण करणारे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्या अंमळनेर इथे आयोजित युतीच्या मेळाव्यात भाजपच्या दोन गटात अक्षरश: फ्रीस्टाईल मारामारी झाली. मारामारी इतकी रंगली की सोडवणूक करण्याच्या निमित्ताने मंत्री महाजन हेच कार्यकर्त्यांना लाथा घालताना दिसत होते. महाजन यांचा बॉडीगार्ड याला व्यासपीठावरच धक्का लागल्याने लोणळ घ्यावी लागली. युतीच्या मेळाव्यात भाजपतल्या या मारामारीची सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच मजा घेतली. मारामारी सोडवण्याच्या निमित्ताने ते मध्ये पडले खरे. पण स्वत:च मजा पाहण्यात मश्गूल होते.

जळगाव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपात अनेक उलथापालथ होत आहेत. जिल्ह्यातले मंत्री गिरीश महाजन यांच्या तडजोडीच्या राजकारणाने अनेक कार्यकर्ते बिथरले आहेत. यामुळे पक्षात नाराजीचे सूर बाहेर पडत असून गट-तटाचे राजकारणाचा उच्छाद निर्माण झाला आहे. बुधवारी अमळनेर येथे प्रताप मिल मैदानावर युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी महाजन यांनी युतीचा मेळावा आयोजला होता. मेळावा सुरू होताच आमदार स्मिता वाघ यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा सुरू केल्या. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. यामुळे एकच गोंधळ उडाला.

- Advertisement -

सुरुवातील वाद सुरू असताना महाजन मजा पाहत होते. प्रकरण हाताबाहेर जाते आहे, असे पाहून महाजन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हे करताना त्यांची दमछाक झाली. या गोंधळात महाजन यांनाही धक्काबुक्की झाली. अर्धा तासानंतर पुन्हा मेळावा पूर्ववत झाला. मात्र, तरीही हा वाद कमी झाला नाही. मेळावा सुरू असताना जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांना लाथांनी मारहाण केली. खुद्द जिल्हाध्यक्षच हाणामारी करीत असल्याने त्यांच्या समर्थकांनीही मंचावर धाव घेत पाटील समर्थकांनाही मारहाण सुरू केली. यामुळे मेळाव्यात प्रचंड गोंधळ उडाला. हा गोंधळ पाहता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून खाली ढकलले. तेव्हा त्यांचाही तोल गेला. त्यांचे बॉडीगार्डना धक्क्यामुळे व्यासपीठावरच लोळण घ्यावी लागली.

लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांना उमेदवारी नाकारली होती. ती स्मिता वाघ यांना देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. नंतर अचानक बदल स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेश पाटील यांना उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला होता. या आदलाबदलीने जिल्ह्यात खदखद होती. ती या मेळाव्याच्या निमित्ताने पुढे आली.

- Advertisement -

महाजनांचा ताफा रोखला
भाजप – शिवसेना युतीच्या मेळाव्यासाठी अमळनेर येथे येत असताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या वाहनांचा ताफा पाडळसरे धरण कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी रोखला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी अमळनेरच्या प्रवेशद्वाराजवळ घडला. पाडळसरे धरण पूर्ण करावे, अशी मागणी कृती समितीची होती. महाजन यांच्या वाहनांचा ताफा अमळनेरात शिरताच तिथे हातात झेंडे घेऊन उभ्या असलेल्या पदाधिकार्‍यांनी पुढे येऊन तो रोखला. वाहने थांबताच गिरीश महाजन हे खाली उतरले आणि या समितीच्या पदाधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -