घरमहाराष्ट्रनरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादीला राम राम; महामंडळ मिळताच भाजपप्रवेश

नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादीला राम राम; महामंडळ मिळताच भाजपप्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेल अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली होती. “त्यामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे नरेंद्र पाटील यांनी मायमहानगरच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. नुकतेच राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी अराफत शेख यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनीदेखील शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे अध्यक्षपद आणि शिवसेनेचे उपनेतेपद सोडून भाजमध्ये प्रवेश केला होता.

Narendra Patil Resign from NCP Party
नरेंद्र पाटील यांनी दिलेले राजीनामा पत्र

अधिक वाचा – सेनेचे हाजी अराफत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सत्तेत आल्यापासून भाजपने महामंडळाच्या नेमणूका जाहीर करण्यात दिरंगाई केली होती. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने आता महामंडळे आणि प्राधिकारणाची अध्यक्षपदे देऊन इतर पक्षातील नेत्यांना आपल्याबाजूने वळवण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

यावेळच्या निवडणुकात मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा असणार आहे. मराठा समाज हा काहीसा भाजपवर नाराज असल्याचे ओळखून भाजपने माथाडी कामगारांचे नेते आणि गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्षरत असणारे नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. यामुळे माथाडी कामगार असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज यांना भाजपकडे आकृष्ट करण्यासाठी नरेंद्र पाटील यांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे.

अधिक वाचा – निवडणुकीच्या तोंडावर सरकारला जाग; महामंडळे, प्राधिकरणावर नियुक्त्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -