घरमहाराष्ट्रराज्यात सर्वात मोठ्या टप्प्यासाठी २९ एप्रिलला मतदान

राज्यात सर्वात मोठ्या टप्प्यासाठी २९ एप्रिलला मतदान

Subscribe

येत्या २९ एप्रिलला महाराष्ट्रात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यावेळी १७ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे.

येत्या २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. राज्यातल्या एकूण १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून ३ कोटी १२ लाख मतदार या क्षेत्रामध्ये येतात. यामध्ये १ कोटी ६६ लाख ३१ हजार मतदार हे पुरूष असून १ कोटी ४५ लाख ५९ हजार महिला आहेत. या चौथ्या टप्प्यामध्ये तृतीयपंथी उमेदवार आणि मतदारांची संख्याही मोठी असून एकूण ३३२ तृतीयपंथी मतदार मतदान करणार आहेत. महाराष्ट्रातल्या मतदानासाठीचा हा शेवटचा आणि सर्वात मोठा टप्पा असल्यामुळे निवडणूक यंत्रणाही कंबर कसून कामाला लागली आहे. एकूण १०२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून १ लाख ७ हजार ९९५ इव्हीएम तर ४३ हजार ३०९ व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आली आहेत. एकूण ३३ हजार ३१४ मतदान केंद्र या १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये आहेत.

मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या

मुंबई दक्षिण-मध्य

- Advertisement -

एकूण मतदार १४ लाख ४० हजार १४२

पुरुष – ७ लाख ७७ हजार ७१४

- Advertisement -

महिला – ६ लाख ६२ हजार ३३७

मतदान केंद्र – १५७२

 

मुंबई दक्षिण

एकूण मतदार १५ लाख ५३ हजार ९२५

पुरुष – ८ लाख ५४ हजार १२१

महिला – ६ लाख ९९ हजार ७८१

मतदान केंद्र – १५७८

 

मुंबई उत्तर

एकूण मतदार १६ लाख ४७ हजार २०८

पुरुष – ८ लाख ९० हजार

महिला – ७ लाख ५६ हजार ८४७

मतदान केंद्र – १७१५

 

मुंबई उत्तर-पश्चिम

एकूण मतदार १७ लाख ३२ हजार

पुरुष – ९ लाख ५० हजार ३०२

महिला – ७ लाख ८१ हजार ७६५

मतदान केंद्र – १७६६

 

मुंबई उत्तर-पूर्व

एकूण मतदार १५ लाख ८८ हजार ३३१

पुरुष – ८ लाख ६४ हजार ९०३

महिला – ९ लाख १० हजार ६४६

मतदान केंद्र – १७२१

 

मुंबई उत्तर-मध्य

एकूण मतदार १६ लाख ७९ हजार ७३२

पुरुष – ९ लाख १६ हजार ६२७

महिला – ७ लाख ६३ हजार

मतदान केंद्र – १७२१

 

भिवंडी

एकूण मतदार १८ लाख ८९ हजार ७८८

पुरुष – १० लाख ३७ हजार ७५२

महिला – ८ लाख ५१ हजार ९२१

मतदान केंद्र – २२००

 

कल्याण

एकूण मतदार १९ लाख ६५ हजार १३१

पुरुष – १० लाख ६१ हजार ३८६

महिला – ९ लाख ३ हजार ४७३

मतदान केंद्र – २०६३

 

ठाणे

एकूण मतदार २३ लाख ७० हजार २७६

पुरुष – १२ लाख ९३ हजार ३७९

महिला – १० लाख ७६ हजार ८३४

मतदान केंद्र – २४५२

 

नंदुरबार

एकूण मतदार १८ लाख ७० हजार ११७

पुरुष – ९ लाख ४३ हजार ७४५

महिला – ९ लाख २६ हजार ३५०

मतदान केंद्र – २११५

 

धुळे

एकूण मतदार १९ लाख ४ हजार ८५९

पुरुष – ९ लाख ९३ हजार ९०३

महिला – ९ लाख १० हजार ९३५

मतदान केंद्र – १९४०

 

दिंडोरी

एकूण मतदार १७ लाख २८ हजार ६५१

पुरुष – ९ लाख १ हजार ८२

महिला – ८ लाख २७ हजार ५५५

मतदान केंद्र – १८८४

 

नाशिक

एकूण मतदार १८ लाख ८२ हजार ४६

पुरुष – ९ लाख ८८ हजार ८९२

महिला – ८ लाख ९३ हजार १३९

मतदान केंद्र – १९०७

 

पालघर

एकूण मतदार १८ लाख ८५ हजार २९७

पुरुष – ९ लाख ८९ हजार

महिला – ८ लाख ९६ हजार १७८

मतदान केंद्र – २१७०

 

 

मावळ

एकूण मतदार २२ लाख ९७ हजार ४०५

पुरुष – १२ लाख २ हजार ८९४

महिला – १० लाख ९४ हजार ४७१

मतदान केंद्र – २५०४

 

शिरुर

एकूण मतदार २१ लाख ७३ हजार ५२७

पुरुष – ११ लाख ४४ हजार ८२७

महिला – १० लाख २८ हजार ६५६

मतदान केंद्र – २२९६

 

शिर्डी

एकूण मतदार १५ लाख ८४ हजार

पुरुष – ८ लाख २१ हजार ४०१

महिला – ७ लाख ६२ हजार ७३२

मतदान केंद्र – १७१०

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -