CoronaVirus: नागपुरात चार तर गोंदियात एक नवा रुग्ण, आकडा १३५वर!

Mumbai
coronavirus
कोरोना व्हायरस

राज्यात करोना पॉझिटिव्ह आकडा झपाट्याने वाढत आहे. नागपुरात चार नवे रुग्ण आढळले असून गोंदियात एक करोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३१ वरून १३५वर पोहोचली आहे. तसंच नागपुरातील रुग्णांची संख्या आता ९वर गेली आहे. आतापर्यंत राज्यात करोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील ५ , मुंबईतील १२ आणि संभाजीनगरमधील येथील एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तरी देखील करोनाचे वाढते रुग्णांची संख्या पाहून राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काल नागपुरात एक आनंदाची बातमी समोर आली. नागपुरातील पहिला करोना बाधित रुग्ण ठणठणीत बरा झाला. तसेच या रुग्णाला डॉक्टरांनी डिस्चार्च दिला आहे. त्यामुळे करोनामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, फक्त स्वतःची काळजी घ्या आणि लॉकडाऊनमुळे काळात घरीच बसणे पसंत करा, असे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालू नका आणि दुसऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचवू नका, अशी साथ घालण्यात आली आहे.

नागपुरात आढळून आलेल्या पहिल्या करोना संक्रमित रुग्णाला काल दुपारी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी पोहोचलो आहे. ५ मार्चला अमेरिकेतून नागपुरात आल्यानंतर या रुग्णामध्ये करोनाचे लक्षण दिसून आले. ११ मार्च रोजी या रुग्णाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सतत सुधारणा होत होती. त्याचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नियमाप्रमाणे आता त्याला १४ दिवस घरात राहावे लागणार आहे.


हेही वाचा – CoronaVirus: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या वाढली!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here