घरमहाराष्ट्रबीडमध्ये साखरेच्या ट्रकने एकाच कुटुंबातील ४ जणांना चिरडले

बीडमध्ये साखरेच्या ट्रकने एकाच कुटुंबातील ४ जणांना चिरडले

Subscribe

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून ट्रक बाईकवर उलटल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

माजलगाव – परभणी रोडवर साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या ट्रकखाली चिरडून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. परभणी फाटाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. पाडव्यानिमित्ति देवदर्शन करुन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी गेलेल्या सोळंके कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

अशी घडली घटना

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून ट्रक बाईकवर उलटल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दयानंद सोळंके हे जांबसमर्थ येथे एका खाजगी बँकेत नोकरीला होते. सोळंके कुटुंबिय दिवाळीनिमित्त माजलगावला आले होते. आज पाडवा असल्याने ते आपल्या गावाकडील दैवत असलेल्या गंगामसला येथील मोरेश्वराच्या दर्शनाला गेले होते. गणपतीचे दर्शन घेऊन सोळंके कुटुंबिय त्यांच्या नातेवाईकांसह दोन बाईकवरुन माजलगावकडे परत येत होते. दरम्यान अपघात झाला.

- Advertisement -

एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

एच.पी. गॅस गोदामजवळ समोरून साखरेची पोते घेऊन येणारा ट्रक विरुद्ध दिशेने त्यांच्या सोळंके आणि त्यांच्या नातेवाईकाच्या बाईकवर येऊन पलटी झाला. या अपघातामध्ये सोळंके कुटुंबातील चार जणाचा जागीच मृत्यू झाला. दयानंद सोळंके (४० वर्ष), संगीता सोळंके (३६ वर्ष), राजनंदनी सोळंके (७ वर्ष), पृथ्वीराज सोळंके (५ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान साखरेचा ट्रक चालक दारुच्या नशेमध्ये असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -