घरमहाराष्ट्रबँकेतील सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; ४ जण जखमी

बँकेतील सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; ४ जण जखमी

Subscribe

जळगाव येथील एका सेंट्रल बँकेच्या शाखेत सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बँकेतील सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना जळगाव येथे घडली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत मंगळावारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले लालचंद चौधरी कामावर आले. मंगळवारी नेहमीप्रमाणे बँकेत दैनंदिन व्यवहार सुरू होते. अनेक ग्राहक आर्थिक व्यवहारासाठी बँकेत आलेले होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी यांच्या ताब्यातील डबल बोअरची बंदूक अचानक लॉक झाली. दरम्यान, बंदुकीचा लॉक काढत असताना अचानक बंदुकीतून गोळी फायर झाली. ही गोळी तळवेल येथे राहणाऱ्या प्रमिला वसंत लोहार आणि वरणगाव येथे राहणाऱ्या शोभा प्रकाश माळी, कलाबाई चौधरी तसेच राधेश्याम छबीलदास जैस्वाल यांना लागली. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बँकेत एकच खळबळ उडाली. फायरिंगचा आवाज ऐकून पळापळ देखील झाली. या घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी बँकेत धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी यांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तांत्रिकांचे अजब उपचार; मुलीचे डोळेच काढून शरीराला त्रिशूलने भोसकले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -