नाशकात चार नवे कंटेन्मेंट झोन; सहा निर्बंधमुक्त

Nashik
Corona

नाशिक शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला परिसरात करोनाबाधित नवीन रुग्ण आढळून न आल्याने महापालिकेने शनिवारी (दि.२३) शहरातील सहा कंटेन्मेंट झोन निर्बंधमुक्त केले आहेत. तर, रुग्ण आढळून आल्याने चार नवे रुग्ण कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. इंदिरानगर, तारवालानगर-पंचवटी, तक्षशिला रो-हाऊस कोणार्कनगर, अयोध्यानगरी-हिरावाडी, हरी दर्शन अपार्टमेंट-धात्रकफाटा-पंचवटी, सागर व्हिलेज, धात्रकफाटा अशी निर्बंधमुक्त करण्यात आलेल्या झोनची नावे आहेत. तर, शनिमंदिरामागे-दिंडोरी रोड, राणाप्रताप चौक-सिडको, मुमताझनगर-वडाळा, लेखानगर-सिडको हे परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून निम्याहून अधिक शहर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २२ मार्चपासून शहरात एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेतर्फे रुग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंत झोन म्हणून घोषित केला जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर जावू नये, यासाठी निर्बंध घातले जात होते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. एखाद्या परिसरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला की, तो भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यामुळे या भागात पोलिस बंदोबस्त, तसेच पालिकेची आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. यावर उपाय म्हणून रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित न करता रुग्ण राहतो ती इमारत कटेंन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्तांनी दाट लोकवस्ती असणारे नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली आहेत. त्यामुळे नागरिकांची निर्बंधामधून बर्यापैकी सुटका झाली आहे. तसेच, झोनमध्ये १४ दिवसांत बाधित नवीन रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शहरातील शनिवारी सहा झोन निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here