अशोक चव्हाण, संजय निरुपम गुलदस्त्यात

Mumbai

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची चौथी यादी दिल्लीत जाहीर करण्यात आली असून एकूण २२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांंची घोषणा केली असली तरी राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसला अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी या दोघांचा नावांची घोषणा केली जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे.

काँग्रेसतर्फे आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात अनेक बड्या नेत्यांच्या नावाची घोषणा केली असली तरी संजय निरुपम यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. तर अशोक चव्हाण यांचे देखील नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे माजी खासदार आणि सध्याचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा हे देखील दिल्लीत दाखल झाले होते. त्यामुळे आगामी यादीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. मात्र या यादीतदेखील ही नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. काँग्रेसने जाहीर केलेल्या एकूण २२ उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील एकूण पाच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत

ज्यात चंद्रपूरसाठी विनायक बांगडे, जालनासाठी विलास औतडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्याबरोबरच भिवंडी मतदारसंघासाठी सुरेश तावरे, लातूर मतदारसंघासाठी माचीलंद्र कामंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रासह या यादीत छत्तीसगढ मतदारसंघासाठी चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर जम्मू-काश्मीरसाठी तीन नावे जाहीर करताना त्यातील एक जागा नॅशनल कॉन्फरन्ससाठी सोडण्यात आल्याचे यावेळी जाहीर करणत आले आहे. तर ओडीशासाठी दोन आणि तामिळनाडूसाठी एकूण ८ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूमधून डॉ. के.जयकुमार, डॉ. ए.चल्लीकुमार यांना संधी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here