घरमहाराष्ट्रमहावितरणच्या अधिकार्‍यांना भायुमोकडून बांगड्यांची भेट

महावितरणच्या अधिकार्‍यांना भायुमोकडून बांगड्यांची भेट

Subscribe

ग्रामीण भागात विजेचा लंपडाव

महावितरणच्या गलथान व मनमानी कारभाराचा तालुक्यातील ग्रामीण भागाला कमालीचा फटका बसत आहे. जनतेच्या मनातील रोष संबंधित अधिकार्‍यांना कळावा यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे त्यांना बांगड्यांची भेट देण्यात आली.गेल्या मंगळवारी सकाळपासून रोठ, किल्ला, धामणसई, मेढे, घोसाळे, सानेगाव या ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत कधी होणार याची नागरिकांना कोणतीही माहिती कार्यालयातून मिळत नव्हती, तसेच संबंधित अधिकार्‍यांचे मोेबाईलही बंद असल्याने ग्रामस्थ कमालीचे संतापले होते. बुधवारी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष संजय कोनकर व भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग हे याचा जाब विचारण्यासाठी रोहे वीजवितरणच्या कार्यालयावर धडकले. यावेळी कोणीही जबाबदार अधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकार्‍यांना भाजपाच्यावतीने बांगड्यांचा आहेर देत त्यांचा निषेध करण्यात आला. कार्यकारी अभियंता घायतडक यांना या सततच्या प्रकाराचा जाब विचारत फैलावर घेतल्यानंतर पुढील पंधरा दिवसात ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन त्यांनी नेत्यांना दिले.

अनियमित वीज पुरवठा, चुकीची व अवाजवी बिले, मागणी करूनही वेळेत वीज मीटर न देणे या व अन्य कारणामुळे महावितरणचे येथील कार्यालय टीकेचे धनी होत आहे. ज्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे द्यावी, अशी अपेक्षा असते तेच अधिकारी जागेवर नसल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -