घरCORONA UPDATECoronavirus: धारावी कोरोनाच्या विळख्यात? आणखी रुग्ण पॉझिटिव्ह आढळला

Coronavirus: धारावी कोरोनाच्या विळख्यात? आणखी रुग्ण पॉझिटिव्ह आढळला

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी हा आकडा ४१६ वर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात ८१ कोरोना बाधितांची नोंद झाली. राज्यातील रुग्नांमध्ये सर्वाधिक मुंबईतील संख्या असून मुंबईत ५७ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे १९ मृत्यू झाले आहेत. मात्र कोरोना बाधित एकूण ४२ जणांना रविवारी घरी सोडण्यात आले आहे.

धारावी कोरोनाच्या विळख्यात

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आता कोरोनाने शिरकाव केला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाची लागण झालेल्या एका ५६ वर्षीय रुग्णाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला आहे. तर तो राहत असलेल्या एसआरए इमारतीला सील करण्यात आले असून त्याच्या घरातील ७ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. सदर व्यक्तीचा गारमेंट व्यवसाय होता. तो एका धामिर्क स्थळी ये – जा करीत असे. त्यामुळे आता त्या धार्मिक स्थळातील नागरिकांचा शोध घेण्यात येत असल्याचे समजते.

- Advertisement -

तर धारावी परिसरत काम करणाऱ्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता धारावीतील झोपडपट्टीही कोरोनाच्या रडारवर आली आहे. तर मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्यासमोर आणखीन मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

या सफाई कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली आणि त्याच्यात कोरोनासारखी लक्षणे दिसू लागली त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर कर्मचारी राहत असलेला भाग सध्या सील करण्यात आला आहे. या भागात बाहेरील व्यक्तीला आत जाऊ दिले जात नाही व त्या भागातील व्यक्तींनाही बाहेर जाऊ दिले जात नाही. सदर व्यक्तीला कोरोनाची बाधा कधी व कशी काय झाली, तो कोणाच्या संपर्कात आला होता का, त्यानंतर हा सफाई कर्मचारी आणखीन कोनाकोणाच्या संपर्कात आला होता याचा शोध घेण्यात येत आहे. या सफाई कर्मचाऱ्याची पत्नी, मुलगा, सून आणि त्यांची मुले या सर्वांची तपासणी आणि चाचण्या केल्या जात आहेत. तसेच, हा सफाई कर्मचारी ज्या धारावी परिसरात काम करीत होता तेथे त्याच्या सॊबत काम करणाऱ्या व त्याच्या संपर्कात आलेल्या सहकारी कर्मचार्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्हावार आकडेवारी

पुणे पालिका ६
पिंपरी चिंचवड ३
मुंबई ५७
नगर ९
ठाणे ५
बुलढाणा १

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -