घरमहाराष्ट्रFRPचं आंदोलन चिघळलं, साखर कारखान्याचं कार्यालय पेटवलं; कागदपत्र जळून खाक

FRPचं आंदोलन चिघळलं, साखर कारखान्याचं कार्यालय पेटवलं; कागदपत्र जळून खाक

Subscribe

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊसाच्या एफआरपीचं आंदोलन चिघळलं. वेळेत FRP न दिल्यानं क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय आंदोलकांनी पेटवलं. कारखान्याला लावलेल्या आगीत कार्यालयातील कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झालं आहे. मंगळवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला. सांगली जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यामुळे हा वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.

एफआरपीच्या मुद्द्यावर स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यंदाचा उस गळती हंगाम सुरु होण्यापूर्वीच एक रकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनांनी केली होती. त्यानंतर सांगलीसह कोल्हापुरात आंदोलनेही झाली. त्यानंतर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचं मान्य केलं. मात्र हंगाम सुरु होऊन दोन-तीन महिने उलटून गेले, तरी देखील बहुतांश शेतकऱ्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही आहे. यावरुन स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक होत कारखान्यांना इशारा दिला होता. तरी देखील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली नाही. यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटना अधिकच आक्रमक होत आंदोलन करायला सुरुवात केली.

- Advertisement -

दरम्यान, हे आंदोलन आता चिघळलं असून सांगलीतील घोगाव येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय पेटवलं. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारात कार्यालयातील कागदपत्र आणि फर्निचर जळालं.


हेही वाचा – मोदी सरकार अहंकाराने पेटलंय; शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेची टीका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -