घरमहाराष्ट्रसलमानच्या चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवत केली फसवणूक

सलमानच्या चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवत केली फसवणूक

Subscribe

चित्रपटामध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना पुणे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत.

चित्रपटामध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेला सलमान खानचा एका चित्रपटात काम देतो असे सांगितले. एका बहुर्चित किक -२ हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असून त्या चित्रपटात तुला काम देतो असे एका अज्ञात व्यक्तींने महिलेला सांगितले. दरम्यान, महिलेला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून त्यांना या चित्रपटाचे कास्टिंग करत असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चित्रपटात सहाय्यक भूमिका देतो असे सांगितले. तसेच महिलेच्या भावाला देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्या महिलेकडून १ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा तिला ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी महिलेने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकऱणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भारत’नंतर ‘किक २’मध्येही दिसणार सलमान-दिशाची जोडी?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -