घरट्रेंडिंगखुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अडीच रुपयांनी त्वरित कमी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेल प्रितिलीटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

पेट्रोल-डिझेल २.५० रुपये प्रतिलिटरने स्वस्त होणार असल्याची महत्वाची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. जेटली यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार १.५ रुपयांपर्यंतची एक्साईज ड्युटी कमी करेल. तर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरामागे १ रुपया कमी करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना इंधन खरेदी करतेवेळी प्रतिलिटर २.५० (अडीच) रुपयांची सूट मिळणार आहे. दरम्यान ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही जेटली यांनी सांगितलं. ‘केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ग्राहकांना अडीच रुपयांचा दिलासा दिला, त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही अडीच रुपयांची कपात केल्यास (पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्यास) ग्राहकांना एकूण ५ रुपयांनी इंधन स्वस्त मिळेल’, असंही जेटली म्हणाले.

दरम्यान जेटलींच्या या मागणीचं स्वागत करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अडीच रुपयांनी त्वरित कमी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेल प्रितिलीटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत अर्थमंत्री जेटली म्हणाले, ‘यासंदर्भात आम्ही देशातील सर्वच राज्यांशी चर्चा करणार असून प्रत्येक राज्याने तातडीने याबाबत घोषणा करावी असं आवाहन आम्ही करणार आहोत’. ‘आंतराष्ट्रीय बाजारात’ कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे ही इंधन दरवाढ होत आहे’, अशी माहिती जेटली यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

जेटलींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे: 

  • तेलाची किंमत सरकार २.५० रुपायांनी कमी  करणार 
  • एक्साईज ड्युटी १.५० रुपयांनी कमी होणार
  • तेल कंपन्या १ रुपया कमी करणार
  • राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट अडीच रुपयांनी कमी करावा
  • रुपयांची किंमत इतक्या वर्षांत पहिल्यांदा घसरली
  • अर्थव्यवस्थेसाठी काही महत्वाची पाऊलं केंद्राने उचलली आहे
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढाली दरवाढीला कारणीभूत
  • आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेल्याच्या किंमती वाढल्याने इंधन वाढले
  • कच्या तेलाची किंमत ८६ डॉलरच्या वर गेली आहे 
  • देशातील महागाई आता नियंत्रणात आहे
  • देशामधल्या जनतेवर या सगळ्याचा बोजा पडून देणार नाही
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -