Saturday, August 8, 2020
Mumbai
29 C
घर ताज्या घडामोडी पुणे : अकरावीच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात

पुणे : अकरावीच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात

पुणे शहरात आजपासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड यासह इतर मनपा क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून यावेळी गुणपत्रिकेद्वारे फॉर्म भरता येणार आहे.

Pune
fyjc online admission start in pune and pimpri chinchwad
अकरावी प्रवेश

पुणे शहरात आजपासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड यासह इतर मनपा क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून यावेळी गुणपत्रिकेद्वारे फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे यावेळी इतर कागदपत्रांची सक्ती नसणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरुन अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे.

फॉर्म ब्लॉक करणे आवश्यक

विशेष म्हणजे शुल्क भरुन फॉर्म ब्लॉक करणे आवश्यक असून अर्जातील माहिती शाळा मार्गदर्शन केंद्रावरुन प्रमाणित करुन घेणे. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग-१ ऑनलाईन तपासून प्रमाणित व्हिरिफाईड करुन घ्यावा. यावेळी विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिकेद्वारे ११ वीचा प्रवेश अर्ज भरता येणार आहे. कोरोनामुळे इतर कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होणार नाही. अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी ही माहिती दिली.

११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणांमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतले जाणार आहे. ही प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची वेळ दिली जाणार आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडलेल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असतील तर ते अपलोड करु शकतील. त्याचप्रमाणे क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक आहे.

११ वी प्रवेशाची क्षमता

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here