घरमहाराष्ट्र'या' कारणासाठी केला होता गडचिरोलीत हल्ला

‘या’ कारणासाठी केला होता गडचिरोलीत हल्ला

Subscribe

गडचिरोलीतील जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाच्या घटनेवर नक्षलवाद्यांची पहिला जाहीर प्रतिक्रिया समोर आली असून गेल्यावर्षी कसनासूर बोरीया येथे झालेल्या चकमकीचा बदला घेण्यासाठीच हा स्फोट घडवून आणला, अशा आशयाची पत्रकं नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांत फेकली आहेत. दरम्यान, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी झालेल्या जांभुळखेडा नक्षलवादी हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते तर एका वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. प्रतिरोध सप्ताहादरम्यान आम्ही कसनासूर बोरीयाच्या चकमकीच्या निषेधार्थ जांभुळखेड्यात भूसुरुंग स्फोट घडवले, असे पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल समितीने हे पत्रक काढले आहे.

हल्ल्यात ४० जवान शहिद 

जवानांवर यशस्वीपणे हल्ला केल्याबद्दल नक्षलवाद्यांच्या कॅडरचे संघटनेने अभिनंदन केले आहे. सुरक्षा दलांविरुद्ध जनसंघर्ष तीव्र करण्याचे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. दरम्यान, कसनासूर बोरीया आणि नैनर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींत सुरक्षाबलाच्या जवानांनी ४० जवानांना ठार मारले होते. या हल्ल्याला एक वर्ष झाल्याने नक्षलवाद्यांकडून प्रतिरोध सप्ताह पाळला जात होता. या सप्ताहादरम्यानच जांभुळखेड्याचा हल्ला घडवून आणण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -