गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ट्रक पेटविला

नक्षल्यांचा सप्ताह सुरू असल्याने पुन्हा एक ट्रक पेटवून दिले आहे. कोरची तालुक्यातील डोंगरगाव पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरील कोरची घाट येथे ही घटना घडली.

FIRE
प्रातिनिधिक फोटो

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र व जाळपोळ सुरूच आहे. २५ ते ३१ जानेवारी दरम्यान नक्षल्यांचा सप्ताह सुरू असल्याने पुन्हा एक ट्रक पेटवून दिले आहे. कोरची तालुक्यातील डोंगरगाव पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरील कोरची घाट येथे ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोरची रस्त्यावरील झाडे तोडून रस्ता अडवण्यात आला आहे. तसेच ट्रक पेटवून देत नक्षली बॅनर बांधण्यात आले आहे. नक्षल्यांच्या सप्ताहानिमित्त ३१ जानेवारीला भारत बंदचे आवाहन या बॅनरच्या माध्यमातून केले आहे. गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळ असलेल्या जामगाव येथेही रस्ता कामांवरील ४ ट्रॅक्टर, २ जेसीबींची जाळपोळ केल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर येथील स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.