घरमहाराष्ट्रनाशिकदेशभरातील २१ लाख ८० हजार विद्यार्थ्यांवर गांधी विचारांचे संस्कार

देशभरातील २१ लाख ८० हजार विद्यार्थ्यांवर गांधी विचारांचे संस्कार

Subscribe

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. बोबडे यांची माहिती; ‘आयएमआरटी’त पारितोषिक वितरण - गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व समाजकार्य महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षेचे परितोषिक वितरण कार्यक्रम गुरुवारी (दि.२३) संपन्न झाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातसह आठ राज्यांमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या या परीक्षेस 21 लाख 80 हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन लाख ऐशी हजार विद्यार्थी महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालतील 47 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता माध्यमिक शाळांपासून पदव्युत्तर महाविद्यालयांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता, अशी माहिती गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. बोबडे यांनी केले.

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व समाजकार्य महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षेचे परितोषिक वितरण कार्यक्रम गुरुवारी (दि.२३) संपन्न झाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातसह आठ राज्यांमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या या परीक्षेस 21 लाख 80 हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन लाख ऐशी हजार विद्यार्थी महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालतील 47 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता माध्यमिक शाळांपासून पदव्युत्तर महाविद्यालयांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता, अशी माहिती गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. बोबडे यांनी केले. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आयएमआरटी इन्स्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी गांधी विचार संस्कार परीक्षा घेण्यामागची भूमिका स्पष्ट करतांना डॉ. बोबडे यांनी गांधीजींच्या जीवनसंदर्भातील महत्वाच्या बाबी सांगत त्यांचे जीवन मूल्ये आज आंगीकरण्याची गरज व्यक्त केली. गांधीजी व भगतसिंग, गांधीजी व नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक आलेख उलगडला. आजच्या युवकांनी ऐकीव महितीपेक्षा आणि कुणीतरी, काहीतरी लिहिलेले असते म्हणून त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा महापुरुषांचे लेखन वाचावे. त्याचे चिंतन करावे. एखादा विचार, एखादी व्यक्ती आवडत नसेल तेव्हा आपण त्याचा द्वेष करतो. त्यापेक्षा त्यांना वाचवे. समजून घ्यावे. जीवनात शुद्ध हवा, शुद्ध पाणी व शुद्ध अन्न ही मूलभूत गरज आहे. मात्र आज सगळीकडे पैशाला, श्रीमंतीला महत्व दिले जाते. त्यामुळे संस्काराची गरज असल्याने आज गांधी विचार, मूल्य रुजवा, असा संदेश डॉ. बोबडे यांनी यावेळी दिला.


याप्रसंगी अध्यक्षस्थानी मराठा विद्यापासरक समाज संस्थेचे शिक्षणधीकरी डॉ. एस. के. शिंदे.उपस्थित होते. व्यासपीठावर माजी प्राचार्य व मानव संसाधन विकास या प्रशिक्षण केंद्राचे संचालक पाटील, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देशमुख, गांधी विचार संस्कार परीक्षा समन्वयक प्रा.चंद्रप्रभा निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील 30 शाळा व महाविद्यालयातील यश प्राप्त केलेले विद्यार्थी, पालक व शाखा प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले विद्यापीठात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनीस सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल यावेळी करिश्मा सूर्यवंशी या विद्यार्थीनीचा सत्कार करणात आला. तसेच नाशिक जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत व कास्य पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पदव्युत्तर गटात समाजकार्य महाविद्यालयातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी नलिनी चासकर हिला जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. समाजकार्य तसेच महाविद्यालयातीलच पदव्युत्तर परीक्षेत सिद्धान्त वाडेकर द्वितीय व अस्मिता पगारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना रजत व कास्य पदक देण्यात आले. तसेच प्राध्यापकांमध्ये प्रा. प्रतिमा बाळासाहेब पवार यांंना नाशिक जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल सुवर्णपदक देण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयचे हे सलग चौथे वर्ष आहे ज्यात पदव्युत्तर गटात सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना गांधी विचार संस्कार परीक्षा घेण्याची गरज का निर्माण होते याची कारणमिमांसा केली. प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मनीषा शुक्ल यांनी सूत्रसंचालन व परितोषिक वितरण उद्घोषणा केली. प्रा. प्रतिमा पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव परीक्षा समन्वयक चन्द्रशेखर पाटील, समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. प्रतिभा पगार, प्रा. डों. घनश्याम जगताप, प्रा. सुनीता जगताप, प्रा. सोनल बैरागी तसेच कार्यालयीन अधीक्षक ज्ञांनेश्वर मवाळ, गिरीश पवार आदी उपस्थित होते.

देशभरातील २१ लाख ८० हजार विद्यार्थ्यांवर गांधी विचारांचे संस्कार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -