गणेशोत्सव मंडळांकडून गरीब मुलांना ४७ लाखांची मदत!

राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी गरीब मुलांना ४७ लाखांची मदत केली आहे. या मदतीचा फायदा तब्बल २ हजार ७०० विद्यार्थ्यांना झाला आहे.

Mumbai
ganesh mandals in maharashtra donates 47 lakhs for poor children
गणेशोत्सव मंडळांकडून गरीब मुलांना ४७ लाखांची मदत

गणेशोत्सव मंडळ सर्वसामान्यांकडून अनेकदा वर्गणी म्हणून पैसे गोळा करतात. असा सर्वसामान्यांचा समज असतो. प्रत्यक्षात ही मंडळं कोणाला मदत करताना दिसत नाही. पण, धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातून तब्ब्ल २ हजार ७६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी ४५ लाख ३७ हजार ४३० रुपयांची मदत केली आहे.

शिक्षणासाठी मदत

अनेकदा बिकट परिस्थितीमुळे जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना शिकता येत नाही. त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. पण, त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्यातील गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात आलं होतं. धर्मादाय आयुक्त कार्यालयातून करण्यात आलेल्या आवाहनाला राज्यासह मुंबईतून प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून सर्वात जास्त लातूरमधील गरीब मुलांना मदत झाल्याचं समोर आलं आहे.

लातूरमधील गरीबांना सर्वात जास्त मदत

धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या आवाहनाचा फायदा सर्वात जास्त लातूरमधील गरीब मुलांना झाला आहे. लातूरमधील तब्बल १ हजार २०० मुलांना शिक्षणाचं साहित्य, वह्या, पुस्तके, शाळेच्या युनिफॉर्मची मदत करण्यात आली आहे.

मुंबईत ५०० हून अधिकांना मदत

लातूर खालोखाल मुंबईत देखील बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला असल्याचं पाहायला मिळालं आहे. एकूण ५६० मुलांना मदत झाली असून त्यांना शिक्षणासाठी पुस्तकांची मदत करण्यात आली आहे. त्यासोबत, औरंगाबादमधील २५१ , कोल्हापूरमधील १९३ मुलांना आणि पुण्यातील ११५ विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. अशाप्रकारे संपूर्ण राज्यातून गणेश मंडळातर्फे एकूण ४५ लाख ३७ हजार ४३० रुपयांची मदत करण्यात आली आहे.

शहर मुलांना झालेली मदत

  • लातूर १२००
  • मुंबूई ५६०
  • औरंगाबाद २५१
  • पुणे ११५
  • कोल्हापूर १९३

धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या सुचनेचं आम्ही पालन केलं आहे. त्यानुसार, आम्ही दहा लाखांची स्कॉलरशिप दिली आहे. २०१८-१९ या चालू वर्षातच ही मदत आम्ही गरजू मुलांना केली आहे.  – सुधीर साळवी, लालबागच्या राजा मंडळाचे सचिव

शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम मंडळाकडून सतत सुरू असतं. त्यात त्यांना शालेय उपयोगी वस्तू पुरवल्या जातात. शिवाय, जे पाडे असतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना ज्या वस्तूंची गरज आहे, त्या देखील पुरवल्या जातात. विभागीय वर्गणीदार असतात त्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षी किमान ६ लाखांपर्यंतची मदत केली जाते. हा आकडा वाढत जातो.  – स्वप्नील परब, सरचिटणीस, गणेशगल्ली मंडळ, लालबाग

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here