घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन जण जखमी

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन जण जखमी

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रभर गॅस गळती होऊन सकाळी झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास भोसरी परिसरात घडली आहे. माऊली साळुंखे, मनीषा साळुंखे आणि सिद्धार्थ साळुंखे असे जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे कुटुंब हे भोसरीमधील संत तुकाराम नगर येथे राहण्यास आहे. त्यांच्या घरात मुलगा, पती आणि त्या स्वतः राहतात. काल मंगळवारी रात्री स्वयंपाक केल्यानंतर त्यांच्याकडून गॅस सिलेंडर सुरू राहीले. त्यामधून रात्रभर गॅस गळती झाली. मनीषा या सकाळी उठल्यानंतर त्यांनी गॅस लाईटरच्या सहाय्याने सुरू केला तेव्हा गॅसचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आले होते. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान, स्फोट झाल्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. काही साहित्य जळून खाक झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -