घरमहाराष्ट्रगीतेंची मुस्लीम मतांसाठी जुळवाजुळव

गीतेंची मुस्लीम मतांसाठी जुळवाजुळव

Subscribe

राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

एकीकडे हिंदुत्व या राष्ट्रीय मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप राज्यात पुन्हा एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे मुस्लीम मतदारांना एकत्र घेऊन मुस्लीम मते मिळवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नावीद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्हयात सोशल इंजिनीअरिंग सुरू केले आहे. रायगडमधील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणार्‍या प्रचार सभांमध्ये मुस्लीम तरूणांच्या प्रवेशावर शिवसेनेने भर दिला आहे.त्यामुळे आपल्या या रणनितीने राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.

आंबेत या बॅरिस्टर अंतुले यांच्या जन्मगावी झालेल्या शिवसेनेच्या मुस्लीम समाज मेळाव्याला जवळपास 2 हजार मुस्लीमांनी हजेरी लावली. मुस्लीम समाजाकडे व्होट बँक म्हणून काही लोक पहात होते. परंतु, त्यांची जहागिरी संपली असल्याचा टोला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना यावेळी लगावला.

- Advertisement -

तर आतापर्यंत मुस्लीम समाजाला शिवसेनेची भीती दाखवून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते. परंतु या समाजाने आता या विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन नावीद अंतुले यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -