घरमहाराष्ट्र'७० वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बापाला जमलं नाही ते करुन दाखवणार'

‘७० वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बापाला जमलं नाही ते करुन दाखवणार’

Subscribe

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली आहे. यावेळी '७० वर्षात त्यांच्या बापाला जमलं नाही ते करुन दाखवणार', असे गिरीश बापट म्हणाले आहेत.

देशभराच्या वातावरणात राजकीय पक्ष सैरभैर झाले आहेत. दोन्ही काँग्रेस पक्षांच वर्णन करायचं झालं तर काळू-बाळूचा तमाशा बरा असं म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित शिवसेना-भाजप कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी दोन्ही काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. ७० वर्षात त्यांच्या बापाला जमलं नाही ते करुन दाखवणार, असे गिरीश बापट म्हणाले आहेत. यावेळी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव यांच्यासोबत सेना-भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले गिरीश बापट?

गिरीश बापट म्हणाले की, ‘काँग्रेस देशातील एकमेव पक्ष तेव्हा, त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे ते निवडून येत असत. नंतरच्या काळात छोटे छोटे पक्ष एकत्र यायचे आणि त्यांच्या विरोधात लढायचे. आज ७० वर्षांनी या देशात काँग्रेसचे एवढे वाईट हाल कोणाचेच झाले नाहीत. काँग्रेस सगळ्याना एकत्र करून आपल्या विरोधात लढत आहे. देश भराच्या वातावरणात राजकीय पक्ष सैरभैर आहेत. दोन्ही काँग्रेसच तर काय वर्णन करावं? त्यापेक्षा काळू-बाळूचा तमाशा बरा. त्यांच्यात करमणूक तरी होते. हा तमाशा फारच विचित्र आहे. यापुढे बापट म्हणाले की, ‘देशातील सध्याची राजकीय स्थिती अस्थिर आहे. मागच्या वेळेपेक्षा जास्त उमेदवार येतील. भाजप सरकार हे एक स्थिर सरकार असून विकासाच्या दिशेने वाटचाल करणारं सरकार आहे. ७० वर्षांमध्ये त्यांच्या बापाला जमलं नाही ते आम्ही करून दाखवणार.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -