घरमहाराष्ट्रमी मोका म्हटलंय; गिरीश बापटांच्या 'त्या' विधानाने पिकला एकच हशा

मी मोका म्हटलंय; गिरीश बापटांच्या ‘त्या’ विधानाने पिकला एकच हशा

Subscribe

एमएनजीएलच्या माध्यमातून प्रदूषणाची पातळी घसरली

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बुधवारी (१३ जाने २०२१) पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत भाजप खासदार गिरीश बापट यांनी वर्षभरात पुणे शहरातील एक लाख घरांमध्ये नैसर्गिक वायू वाहिनी पोहचवणार आहे. यासाठी तांत्रिक अडचणी आणि सर्व विभागीय परवानगी घेण्याच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील असे म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत खासदार गिरीश बापट यांनी केलेल्या एका वाक्यामुळे एकच हशा पिकला होता. मराठी भाषेतील म्हण सोळावं वरीस धोक्याचं, पण मी थोडं बदलतो. सोळावं वरीस मोक्याचे त्यामुळे हा मोका आपण घ्यायचा मी मोका म्हटले आहे. असे विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला होता. येत्या काळात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या माध्यमातून शहरामधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठे यश येणार आहे. आतापर्यंत थोड्या प्रमाणात प्रदूषण नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.

शहरात ५० हजारांपेक्षा अधिक रिक्षा पारंपारिक इंधनाएवजी नैसर्गिक वायू वापरतात. शहरातील सार्वजनिक बस सेवेतही दीड हजार गाड्यांमध्ये नैसर्गिक वायूचा वापर होतो. भविष्यात हे प्रमाण आणखी वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजप खासदार गिरीश बापट यांनी पुढे म्हटले आहे. देशात नैसर्गिक वायू क्षेत्रातील ४० कंपन्यांमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी ही चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

पुणे शहरात आतापर्यंत सुमारे ३ लाख घरांमध्ये नैसर्गिक वायू वाहिणी जोडण्यात आली आहे. भविष्यात याचे प्रमाण वाढणार आहे. शहरातील औद्योगिक वसातीत २२० उद्योगांनाही महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून वायू पुरवठा केला आहे. पुण्यात आयोजि केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार गिरीश बापट यांच्यासह महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे कार्यकारी संचालक एस. हलदार, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -