घरमहाराष्ट्रधुळेकरांना निश्‍चितच बदल घडवून दाखवू - गिरीश महाजन

धुळेकरांना निश्‍चितच बदल घडवून दाखवू – गिरीश महाजन

Subscribe

निवडणूक निकालानंतर गिरीश महाजन यांनी धुळेकरांना निश्‍चितच बदल घडवून दाखवू असे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर आपली लढाई ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज धुळे महापालिकेचा निकाल जाहीर झाला. या निकाला भाजपला घवघवीत यश मिळाले. भाजपला या निवडणूकीत ५० जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपला सोडचिठ्ठी दिलेले धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. निवडणूक निकालानंतर गिरीश महाजन यांनी धुळेकरांना निश्‍चितच बदल घडवून दाखवू असे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर आपली लढाई ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Live Result : धुळे महापालिकेत भाजपचेच ‘अच्छे दिन’

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?

धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. धुळेकरांनी मिशन फिफ्टी प्लस यशस्वी केले. मी मी म्हणणारे आता सर्वच झोपले आहेत. घाणेरड्या प्रचाराला धुळेकरांनीच चपराक दिला आहे. आता भयमुक्त शहर करणे, पाण्याची समस्या सोडवणे याची जबाबदारी आमची आहे. धुळेकरांना निश्‍चितच आता बदल घडवून दाखवू, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी विजयानंतर दिली आहे. त्याचबरोबर भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार अनिल गोटे यांच्याविषयी विचारणा केली असता महाजन म्हणाले की, आमदार गोटेंचे कुठलेही आव्हान आमच्यासमोर नव्हते. आमची लढाई कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी होती. तरीही गोटेंनी प्रचारामध्ये खालची पातळी गाठली होती. सोशल मिडीयावर घाणेरड्या पोस्ट टाकणे, कमरेखालची भाषा वापरणे, चुकीचा आरोप करुन प्रचाराचा स्तर त्यांनी खाली घसरवला. त्या सर्व गोष्टींना धुळेकर जनतेनेच जोरदार चपराक दिला आहे.


हेही वाचा – लोकांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशीनने भाजपाला केलं – अनिल गोटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -