‘भाजपाचे आमदार नसते तर गोटेंना दमडीही दिली नसती’

पांझरा किनारच्या रस्त्यांसाठी भाजप सरकारने ७० कोटी दिले. तुम्ही जर आमच्या पक्षाचे नसते तर आम्ही एक दमडीदेखील दिली नसती, असा टोला गिरीश महाजन यांनी आमदार अनिल गोटे यांना लगावला आहे.

Mumbai
anil_gote_girish_mahajan
भाजप नेते अनिल गोटे आणि गिरीश महाजन (सौजन-सरकारनामा)

पांझरा किनारच्या रस्त्यांसाठी भाजप सरकारने ७० कोटी दिले. तुम्ही जर आमच्या पक्षाचे नसते तर आम्ही एक दमडीदेखील दिली नसती. शहरात आज सुरु असलेल्या विकास कामाचे श्रेय हे आमच्या भाजप सरकारचे आहे, ते स्वत:च्या नावावर खपवू नका, असा जोरदार समाचार घेत जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आमदार अनिल गोटे यांच्यावर प्रथमच जाहिरपणे निशाणा साधला. प्रभाग क्र. ७ मधील भाजप उमेदवार सुनिल बैसाणे, कशिश गुलशन उदासी, किरण कुलेवार आणि हर्षकुमार रेलन यांच्या प्रचारासाठी मोगलाई येथे जाहिर सभा झाली.

वाचा : ‘अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत’

गोटेंचा जोरदार समाचार घेतला

महाजन यांनी सांगितले की, धुळ्यातील जनता आम्हालाच कौल देईल. विरोधकांची पायाखालची वाळू घसरत असल्याने ते बेछूट आरोप करीत आहेत. एक आमदार शासनाने दिलेल्या निधीतून केलेली कामे मी केल्याचे म्हणत आहेत. तुम्ही आमच्या पक्षाचे आमदार होतात म्हणून ७० कोटी रुपयांचा निधी दिला अन्यथा दमडीही दिली नसती, असा टोला लगावत एकाच बाणात त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह आमदार गोटे यांचा जोरदार समाचार घेतला.

वाचा : भाजपमध्ये बोंबाबोंब : अनिल गोटे आणि भामरे यांच्यातील वाद शिगेला

यापूर्वी गोटेंनीही लगावला होता टोला 

यापूर्वी भारतीय जनता पक्षाने धुळे महानगरपालिका निवडणुकीचे अधिकार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवल्याने स्थानिक भाजप आमदार अनिल गोटे नाराज झाले होते. महाजनांनी विरोधकांनाच जवळ धरल्याने गोटे संतप्त झाले. त्यांनी महाजनांवर कडाडून टीका केली होती. आपली भूमिका मांडण्यासाठी पत्र लिहणे, ही आमदार गोटेंची खासीयत आहे. यापद्धतीचे धुळेवासियांना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले होते. त्या पत्रात मंत्री महाजन यांच्यावर नाव घेवून टीका केली होती. आता महाजन यांनीही जाहीरपणे गोटे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

वाचा : माझ्या जीवाला धोका; अनिल गोटेंचा गौप्यस्फोट