इन्स्टाचे मेसेज रीड केले नाही म्हणून तरुणीला अपहरणाची धमकी

Pimpri Chinchwad
instagram crime
इंस्टाग्रामचे मेसेज पाहीले नाही म्हणून तरुणीला अपहरणाची धमकी

सोशल मीडियाचा वाढलेला वापर अनेक समाजविघातक कृतींना निमंत्रण देणारा ठरत आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे सारख्या निमशहरी भागात सोशल मीडियाशी संबंधित अनेक गुन्हे घडत आहेत. असाच एक गुन्ह्याचा प्रयत्न निगडी परिसरात घडला आहे. इस्टांग्रामवर पाठवलेले मेसेजेस न बघितल्याने चिडलेल्या अनोळखी तरुणाने महाविद्यालयीन तरुणीला समोर येऊन अपहरण करण्याची धमकी दिली. हा प्रकार पुण्याच्या निगडी परिसरात घडला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. संबंधित अनोळखी तरुणावर निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीने इस्टांग्रामवरील मेसेजेस न बघितल्याने मनात राग धरून चिडलेल्या तरुणाने संबंधित तरुणीला समोरा समोर येऊन अपहरण करण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. तरुणी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. दरम्यान, घटनेनंतर निगडी पोलिसात तरुणीने फिर्याद दिली आहे.

हे वाचा – वंशाला दिवा हवा म्हणून सुनेला बंद खोलीत डांबून मारहाण 

अनोळखी आरोपीने तरुणीच्या इन्स्टग्रामवर तू माझ्याशी मैत्री करशील का? मी तुला भेटायला आलोय. ‘तुझा मोबाईल नंबर दे’ अशा आशयाचे मेसेज केले होते. परंतु, तरुणीने याकडे लक्ष दिले नव्हते. याचाच राग मनात धरून आरोपी तरुणाने तरुणीचा पाठलाग करत समोर येऊन धमकी दिली. तो म्हणाला की, तू माझे मेसेजेस बघितले नाहीस तर मी तुझे अपहरण करेल, अशी उघड धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here